About Us

      सृष्टीच्या पाठीवर आशिया खंडात हिंदुस्थान एक राष्ट्र आहे. आणि या हिंदुस्थान देशात महाराष्ट्र एक देश आहे. पवित्र तो देश । पावन ते कुळ ।। जेथे हरिचे दास । जन्म घेती ।। महाराष्ट्र ही शूरांची विरांची व महान संतांची जन्मभूमी आहे. प्रभु श्रीरामचंद्र यांनी १४ वर्ष वनवास काढला, तो याच महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अष्टविनायकांची तिर्थक्षेत्र याच महाराष्ट्रातील पुणे व नगर जिल्ह्यात, १२ ज्योतिर्लिंगांपैकी बहुतेक तिर्थक्षेत्र महाराष्ट्रात आहेत. जगाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्ती महाराज, सोपान काका, मुक्ताई यांचे जीवनकार्य या महाराष्ट्रात ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यात लिहीला गेला.
     नवनारायण यांचे अवतारकार्य संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम इ. संतांचे अवतातर हेही महाराष्ट्रात साईबाबा, महिपती महाराज, चैतन्य महाराज तसेच अनेक महान संत या भूमित अवतारास आले. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कळसूबाई शिखराच्या पूर्वेस हरिश्चंद्रगडाच्या कुशीत ब्रम्हगिरीच्या दक्षिणेस शिवनेरीच्या पूर्वेस दक्षिणवाहिनी मुळा व कस नदीच्या तिरावर ऐतिहासिक भूमी असलेल्या अ. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पुर्ण जिल्ह्याच्या सरहद्दी लागत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून घारगाव गावाच्या पूर्वेस ७ कि. मी. अंतरावर असलेले ३००० लोकसंख्या असलेले गाव श्री क्षेत्र अकलापूर.
     गावाच्या उत्तर बाजूस मुळा कस नदीचा संगम, उत्तरेस सह्याद्रीच्या पर्वतरांगा या ठिकाणी वसलेले हे गाव. गावाची भौगोलिक परिस्थिती चढउताराची, दऱ्याखोऱ्या खडकाळ अशी आहे. नेहमी दुष्काळी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती जेमतेम असते. आज असणाऱ्या गावाशेजारी एक जूना गावठाण आहे. शिवकालीन गावठाण होत गावात वेशीजवळ हनुमानाचे मंदीर याच मंदिराशेजारी सिध्देश्वराचे कळसी मंदीर आहे. मंदिरासमोर भव्य असा नंदी, भव्य उंच अशी दिपमाळा, समोर बारव आहे. वडाचे पिंपळाचे मोठमोठे वृक्ष, उत्तरेस टेकडी आणि या टेकडीवर नाही घडविला नाही बैसविला ।। श्री दत्त गुरुराज ।। गावात धार्मिक, श्रध्दाळू व कष्ट करणारे भाविक म्हणून लोक जास्त प्रमाणात होते. एक दिवस गावातील एक धार्मिक सद्गृहस्थ यांना स्वप्नात साक्षात्कार झाला. त्यांनी सकाळी उठल्यानंतर स्नान व देवपुजा करुन गावातील हनुमान मंदिरासमोर गावकरी एकत्र जमतात. त्या ठिकाणी आपल्या निवडक सहकाऱ्यांना पडलेल्या स्वप्नातील साक्षात्काराची माहिती सांगितली. मग सर्व गावकरी एकत्र येऊन जवळच असलेल्या टेकडीवर गेले. टेकडीवर पहाणी करीत असताना वरच्या बाजूला मध्यभागी एक चिर पडलेला भाग दिसून आला. मग गावकऱ्यांनी जुन्या चालीरितीरिवाजाप्रमाणे धार्मिक पूजा करून उत्खनन केले असता साक्षात स्वयंभू दत्त महाराज यांची मुर्ती प्रकट झाली, वालुकामय व चतुर्भुज मुर्ती आज आहे, तशीच पुजा, महाअभिषेक करून लहान असे मंदीर उभारून प्राणप्रतिष्ठा केली तो दिवस होता वैशाख शु. १२ आजपर्यंत या दिवशी येथे भंडारा होत आहे. पुढे काही वर्षांनी वैशाख शु. ५ ते १२ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील थोर किर्तनकार व प्रवचनकार यांची किर्तने व प्रवचने होतात. पूर्व पुण्य फळा आले । साधू चरण घरा आले । भक्तांचे भाग्य उजळले । सदगुरु प्राप्ती ह. भ. प. कोंडाची बाबा डेरे यांनी सुरु करून दिलेले ज्ञानेश्वरी पारायण, संत तुकाराम गाथा पारायण आजही सप्ताह काळामध्ये चालु असते.




     वैशाख शु. १२ दिवशी दु. ३ ते ६ या वेळेत गावातून स्वयंभू दत्त महाराज यांची पालखी निघते. या वेळेत जे वातावरण असते ते भक्तीमय असते. साक्षात स्वयंभू दत्ता महाराज या दिंडीमध्ये सहभागी असतात, ही भक्तांची श्रध्दा आहे. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातून अनेक दत्त भक्त सहभागी होतात. तसेच प्रत्येक वर्षी दत्त जयंतीस दत्त जन्मोत्सवाचा भव्य असा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. घारगाव व परिसरातून दिंड्या घेऊन अनेक भाविक दर्शनास येतात.
     भाविकांना शुभकाम करावयाचे असल्यास गुरुवार हा दिवस महत्वाचा मानला जातो. मंदिर परिसरात सर्वजन श्रध्देने राहतात. सदरच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार होत नाही. अनेक बाबतीत हा अनुभव आला आहे. मंदिरा व मांस भक्षण करून मंदिर परिसरात प्रवेश केल्यास वाईट अनुभव येतात. हे अनेक व्यक्तींना पहावयास व अनुभवायास मिळाले आहे. गावात गुरुवार हा दिवस पवित्र मानला जातो. योगियांची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, गुरु निवृत्तीनाथ महाराज, सोपानकाका, मुक्ताई पैठणहून शुद्धीपत्र घेऊन आपेगाव नेवासा पुढे अकलापुर येथे आले. अचानक सिध्देश्वराच्या मंदीरासमोर भव्य असे पिंपळाचे झाड होते, त्या झाडाखाली माऊलींच्या समवेत असणारा रेडा स्थिरारला व सर्व भावंडे रेड्यासहित विश्रांतीस थांबले आणि जवळच असलेल्या स्वयंभू दत्त महाराजांचे दर्शन करण्यासाठी मंदिराकडे गेले आणि ही सर्व भावंडे रेड्यासह या मंदिरात एक दिवस मुक्कामास थांबले.
     आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला । - गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।। गहिनीप्रसादे निवृत्ती दातार । ज्ञानदेवा सार चोजविले ।। स्वयंभू दत्त महाराजांचे दर्शन घेऊन श्री सिध्देश्वरास प्रार्थना करुन ही सर्व भावंडे रेड्यासह . पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळे या ठिकाणी गेले. तेथे रेहधाने समाधी घेतली आहे. पुढे आळीयाचे बनी । महिशआपुत्र मंगल ज्ञानी ।। जो प्रसवला वेदवाणी । तयाची समाधी सुंदर।। ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली मुक्कामास थांबले होते, त्या श्री सिध्देश्वराच्या मंदिराजवळ ग्रामस्थांनी कळसी मंदीर बांधले आहे. या ठिकाणी माऊर्लीचे कळसी मंदिर आहे. तसेच प्रत्येक वद्य १२ ला अन्नदान व किर्तन होत असते. या मंदिरात पूजा, हरिपाठ, कार्तिकस्थान इ. कार्यक्रम नित्यनेमाने होत असतात. मंदिाच्या आसपासचा परिसर स्वच्छ व सुंदर व निसर्गमय आपणास पहावयास मिळत आहे. अनेक भाविक या ठिकाणी श्रध्दापूर्वक दर्शनास येतात. पुढे काही वर्षांनी एक महान तपस्वी अचानक श्री सिध्देश्वराच्या मंदिरासमोर प्रगट झाले, कोठून आले, कसे आले, त्यांचे पूर्वीचे अवतारकार्य, माता पिता कोण? कोणत्याही प्रकारचा पुरावा आजापर्यंत सापडला नाही. त्यांच्या समवेत गाईंचा कळप होता. बसायला एक घोडी होती. दत्त मंदिर परिसरात गाई चरत असत व सायंकाळी सिध्देश्वराच्या मंदिरासमोर येऊन थांबत असत. इकडे सिध्देश्वराच्या मंदिरासमोर हे योगी पुरुष तपश्चर्या करीत होते. काही दिवसांनी तपश्चर्या झाली होती. गावात दुष्काळ पडला होता. जनावरांना खायला काही नव्हते. म्हणून त्यांनी गावातून स्थलांतर करावयाचे ठरविले. स्वयंभू दत्ता महाराजांचे व श्री सिध्देश्वराचे दर्शन घेऊन आपल्या गाईसमवेत गावाच्या पूर्वेकडे निघाले. ग्रामस्थांना याची कल्पना येऊ शकली नाही. पुढे ते मुंजेवाडी आभाळवाडीमार्गे पारनेर तालुक्यातील पोखरी या गावी गेले. जवळच कन्हेर या गावी त्यांनी आपली तपश्चर्या चालू केली. तेथेही श्री सिध्देश्वराचे मंदिर आहे. या गावातील लोकांनी मंदिर बांधुन मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. पुढे ते पुणे जिल्ह्यातील आणे येथे गेले व काही काळानंतर समाधिस्त झाले. आजही स्वयंभू दत्त महाराज यांचे मंदिरात गावकऱ्यांनी या महान योगी तपस्विची मुर्ती प्राणप्रतिष्ठा करुन बसविली आहे. योगी तपस्विची मुर्ती प्राणप्रतिष्ठा करुन बसविली आहे. ते महान योगी रंगदास स्वामी होय. काही वर्षांनी या गावाचे नवीन गावठाण येथे स्थलांतर झाले आहे. परंतु लोकांची श्रध्दा वाढत गेली. जुन्या मंदिराच्या समोर एक समाधी होती, मंदिराच्या समोर सभामंडपाचे काम करीत असताना या समाधीच्या ठिकाणी उत्खनन करीत असताना या समाधीस स्पर्श झाला आणि एकदम वातावरण बदलून गेले आणि ही वार्ता ग्रामस्थांच्या कानावर गेली व पुढील अनर्थ नको म्हणून परत आहे तिच परिस्थिती पूर्ववत केली व विधीवत पुजा करुन समाधीवरील आवरण होते तसे केले. ही समाधी संजीवन आहे. संतकवी महिपती महाराज राहुरी तालुक्यातील ताहाराबाद यांचे शिष्य कोंडाजीबाबा यांचीही समाधी संजीवन आहे. ज्यावेळेस समाधीस उत्खनन केले, त्यावेळेस महिपती महाराजांचे भक्त मणिकबाबा यांना ताहाराबाद येथे या घटनेचा साक्षात्कार झाला आणि ते तात्काळ श्री क्षेत्र अकलापूर येथे आले व विचारु लागले. ग्रामस्थांनी घडलेला वृत्तांत सर्व सांगितला आणि त्यांना सर्व माहिती देऊन होमहवन केले व नैवेद्य दिला. गावची आर्थिक परिस्थिती बदलत गेली. श्रधअदा वाढत गेली आणि गावातून देहू, आळंदी त्र्यंबकेश्वर, पंढरपूर या ठिकाणी पायी दिंडी सूरू झाली. वारकरी मंडळींची संख्या वाढू लागली आणि गावकऱ्यांनी दत्त मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचे ठरविले.

     गावातील मुंबईकर मंडळाने आपले मंडळ स्थापन करुन निधी जमवला. गावाचे काही शिल्लक व मुंबईकरांचे काही पैसे एकत्र करुन मंदिर बांधावयाचे ठरविले. पारनेर तालुक्यातील कळस या गावचे महादेव क्षिरसागर या कारगिरास मंदिर बांधावयास दिले. सदरचे मंदिर दगडी बांधकामात बांधले गेले आहे. पुढे काही दत्त भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. मंदिराला भव्य असा सभा मंडप आहे. परिसरातील भाविक मोठ्या भक्तीभावाने दर गुरुवारी व पौर्णिमेस महाआरतीचा कार्यक्रम सकाळी ८:३० वा. व दु. १२:३० वा. करतात. या कार्यक्रमास राज्याच्या अनेक भागातून दत्तभक्त मोठ्या प्रमाणात येतात. शिस्त, शांतता, स्वच्छता आपणास पहावयास मिळते. सकाळी ८ वा. महान विद्वान प्रवचकार यांची प्रवचने होतात. अनेक दत्त भक्तांनी महाप्रसादासाठी नंबर लावले आहेत. दर गुरुवारी दर्शनास येणारे भाविक मोठ्या भक्तीभावाने मंदिरास रोख रक्कम म्हणून देणग्या देतात. दत्त भक्तांच्या व कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमातून या देवस्थानचा कायापलट झालेला आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून बोटा या गावापासून ८ कि.मी. व घारगांव पासून ७ कि.मी. अंतर आहे. सदरचा रस्ता डांबरीकरण व्हावा ही ग्रामस्थांची मागणी व या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी ना. मधुकरराव पिचड व तालुक्याचे लोकप्रतिनिधी मा. बाळासाहेब थोरात यांनी पुर्ण केली आहे. दत्त भक्तांना श्री क्षेत्र अकलापूरकडे येण्यास रस्त्याची अडचण नाही. महाराष्ट्र राज्य माजी परिवहन मंडळाच्या एस.टी. बस येतात. ७ ते ८ हजारांचा • जनसमुदाय दर गुरूवारी आरतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातून * अनेक दत्त भक्त व काही पदाधिकारी, अधिकारी नेहमी दर्शनास येतात. कळशी मंदिराचा कलश सोन्याचा असावा, - म्हणून काही माताभगिनींनी देणगी रूपाने सोने दिलं - आणि जवळ जवळ ५१ तोळ सोनं जमा झालं. मुंबई येथील कारगिर यांनी अल्पदरात सुवर्णकलश तयार करुन दिला आणि २९.११.२००३ रोजीच्या मुहुर्तावर प. पू. गगनगिरी महाराज यांचे शुभहस्ते अनेक दत्तभक्त यांच्या सहकार्याने ना. मधुकरराव पिचड, ना. बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यतो असा कलश सोहळा कार्यक्रम पार पाडला. प. पु. गगनगिरी महाराज यांनी या ठिकाणी सर्व भक्तांना दिलेला संदेश हा महत्वाचा संदेश व जीवनाचा उध्दार करणारा संदेश आहे. प. पू. गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आज दत्त भक्तांचे श्रध्दास्थान झाले आहे. अनेक दत्तभक्त मंडळी देणगी व अन्नदान मोठ्या भक्तीभावाने करतात. ज्या टेकडीमध्ये श्री दत्त स्वयंभू प्रकट झाले, त्या अनुसया टेकडीवर ग्रमस्थांनी मंदिरे बांधले असून लोक मोठ्या भक्तीभावाने दर्शनास येतात.

     या परिसराचा व मंदिराचा विकास करण्यासाठी ग्रामस्थांनी पब्लिल ट्रस्ट स्थापन केला आहे. सर्व विश्वस्त मंडळ चांगल्या प्रकारे कार्यभार सांभाळतात. दत्त भक्तांची भक्ती पाहून यापुढील काळात भक्तनिवास व गार्डन बनवायचा मंडळाचा मनोदय आहे. लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. दर गुरुवारी व पौर्णिमेस आरती बरोबर होमहवन व यज्ञ अशा प्रकारचे विधी होतात. झपाट्याने झालेला कायापालट पाहून अनेक दत्त भक्त आश्चर्य व्यक्त करतात. श्रध्देने येणाऱ्या भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात. अनेक भक्तांच्या जीवनात कायापालट झालेला आहे. मंदिराजवळ पाणी नव्हते. गावातून पाण्याची सोय केली होती. परंतू ती अपूरी पडत होती. श्री गंगाधर घुले यांना साक्षात्कार झाला. १-५० रुपया दिसला आणि त्यांनी सांगितले वर धन आहे. तिथे खाली सुध्दा धन आहे. त्यांनी स्वखर्चाने बोअर घेऊन दिला. उंच माळरानावर बोअरला भरपूर पाणी आहे. हा दत्त प्रभुंचा साक्षात्कार आहे. एका भक्ताने पाणी साठवण्यासाठी भव्य अशी पाण्याची टाकी स्वखर्चाने बांधुन दिली आहे. काही दिवसात या ठिकाणी वेगळे अशा प्रकारचे भक्तीमय वातावरण आपणास पहावयास मिळेल. मुंबई, पुणे येथून काही भक्त श्रध्देने दर गुरुवारी येतात व होमहवन करतात. मंदिराच्या सभा मंडप प्रवेशाद्वाराजवळ (कल्पवृक्ष) औदुंबर (आपोआप तयार झालेला) आपणास पहावयास मिळेल. औदुंबर हा वृक्ष युगायुगापासून पवित्र मानला जातो. पूर्वी नृसिंह - अवतारात विष्णुने हिरण्यकश्यपू राक्षसाला मारले, - तेव्हा त्याने आपल्या नखांनी त्या राक्षसाने पोट - विदारण केले, त्या दैत्याच्या पोटात विष होते. त्या - विषाने नृसिंहांच्या हाताच्या बोटांची व नखांची आग होवू लागली. त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणली तेव्हा त्या फळात नखे रोवून नृसिंहाचा दाह शांत झाला. त्यामुळे नृसिंहाने व लक्ष्मीने औदुंबर वृक्षाला वर दिला की तुला नेहमी फळे येतील. तुला कल्पवृक्ष म्हणतील, जे तंला पूज्य मानुन तुझी भक्ती सेवा करतील, त्यांच्या इच्छा पूर्णही होतील. तुझ्या दर्शनाने व स्पर्शाने उग्र विष शांत होईल व मनुष्य पापमुक्त होईल, तुझ्या छायेत बसून जे जप करतील त्यांना लाभ होईल.
     मंदिराचे काम चालु असताना हे काम लोगवर्गणीतून झालेले आहे. बोटा ते अकलापूर रस्त्याचे काम चालु होते. या कामाचे ठेकेदार श्री. नंदुशेठ हाडवळे यांच्याकडे देणगी मागितली. त्यांनी ग्रामस्थांना अपशब्द दिला. ग्रामस्थ परत मागे फिरले. एक महिन्यात नंदुशेठ हाडवळे यांनी ग्रामस्थांची माफी मागितली. या ठिकाणचे दैवत स्वयंभू आहे याची मला कल्पना नव्हती. माझी चूक झाली मला प्रायश्चित्त मिळाले. मला देणगी द्यावयाची आहे. देणगीच नाही तर त्यांनी अन्नदानही केले. आज प्रत्येक गुरुवारी ते दर्शनास येतात. जुन्नर तालुक्यातील आणे गावचे रहिवाशी शिवाजी भोसले यांना साक्षात पहाटेच्या वेळेस दर्शन दिले. त्यांनी मंदिरात चांदीच्या पादुका बसविल्या आहेत. सभामंडपाचे ठेकेदार श्री. चौगुले शेठ यांना काम चालू असताना दर्शन मिळाले. त्यांनी आपले स्वतःचे पैसे खर्च करुन सभा मंडपाच्या कामास मोठा हातभार लावला आहे. गावातील अनेक तरुण वाईट मार्गावर होते. त्यांच्या भावनेत बदल घडला. आज त्यांच्या प्रापंचिक जीवनात आनंदाचे वातावरण आहे.